विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी ची घोषणा करून सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरणारे सरकार असंवेदनशील आहे त्यांना शेतकरी प्रश्ना चा विसर पडलेला आहे अशी जोरदार टीका माजी मंत्री ऍड शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालास बाजारभाव पडले आहेत.देशात पहिली सर्वात मोठी देशपातळीवर शेतकरी कर्जमाफी श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्याचेही मोघे यावेळी म्हणाले.
राज्यात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जातो हे दुर्दैवी आहे असे पूर्वी कधी झाले नव्हते.
त्या खात्याच्या मंत्री महोदयांनी जाहीर नाराजी व्यक्त करत हा विभाग बंद करा असेही म्हटले आहे.इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती दिव्यांगाच्या योजना निराधार यांच्या साठी हा विभाग काम करतो
केवळ मत व सत्ता यासाठी लोकप्रिय घोषणा करायच्या हा सरकार चा हेतू उघड झाला असल्याचा प्रहार शिवाजीराव मोघे यांनी केला. आज यवतमाळ विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री वसंतराव पुरके,यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र मोघे अनिल कनाके उपस्थित होते.