नेवासा तालुका खरीप हंगाम बैठक पंचायत समिती नेवासा येथे घेण्यात आली यावेळी
आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजता नेवासा पंचायत समिती सभागृहात नेवासा तालुका कृषी विभागा मार्फत खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न झाली.या बैठकीस तहसिलदार डॉ.संजय बिरादार,गटविकास अधिकारी संजय लखवाल,उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी,कृषी अधिकारी धनंजय हिरवे,जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे,नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी बाळासाहेब कासार,सहाय्यक निबंध कार्यालयाचे देविदास घोडेचोर,गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड,सुहास धस,महावितरणचे बडवे व मराठे तसेच कृषी भूषण शेतकरी मोहन तुवर,शिवसेना युवा नेते अभिजीत पोटे, महादेव आव्हाड मेजर, संजय वाघ, अभिजीत लुनिया, ज्ञानेश्वर पेचे ,प्रगतशील शेतकरी विकास चावरे,कैलास शिंदे,श्री आदिनाथ पटारे, नानासाहेब डौले यावेळी बैठकीस उपस्थित होते.यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या हस्ते साहित्यांचे व धनादेश वाटप करण्यात आले.