7k Network

तिन खेळाडूं चे रिप्लेसमेंट मुंबई संघाला तारनार का…?

आयपीएल २०२५ मोसमाची सुरवात अडखळत करणाऱ्या चॅम्पियन मुंबई संघाची सुरवात जरी खराब झाली असली तरी या संघाने नंतर जोरदार कम बॅक करत ट्राफि जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या पण आता अवकाश घेत सुरू होणाऱ्या सामन्यात मुंबई संघाचे तीन महत्वाचे खेळाडू संघात नसतील मात्र मुंबई आपला हुकमी एक्का बाहेर काढू शकते…!

भारत-पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातल्या वनडे सीरिजमुळे अनेक परदेशी खेळाडू आयपीएलचे काही सामने मुकणार आहेत. या खेळाडूंऐवजी सगळ्या फ्रॅन्चायजी नव्या खेळाडूंसोबत करार करत आहेत, तर काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत.

 

आयपीएल 2025 पुन्हा सुरू होत असतानाच मुंबई इंडियन्सना धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातल्या सीरिजमुळे मुंबईचे 3 खेळाडू त्यांची साथ सोडणार आहेत. रेयान रिकलटन आणि कॉर्बिन बॉश या दोन्ही खेळाडूंची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीच्या दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली आहे, तर विल जॅक्सची इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली आहे. मुंबई प्ले-ऑफला पोहोचली तर हे तीनही खेळाडू उपलब्ध नसतील.

रिकलटन, बॉश आणि जॅक्स या तीन खेळाडूंच्या बदली मुंबई इंडियन्सनने दोन परदेशी खेळाडूंसोबत आधीच चर्चा सुरू केली आहे. जॉनी बेअरस्टो आणि रिचर्ड ग्लिसन या दोन खेळाडूंसोबत मुंबई इंडियन्सची प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे. मुंबई प्ले-ऑफला पोहोचली तर बेअरस्टो आणि ग्लिसन हे दोन खेळाडू जॅक्स आणि रिकलटनची जागा घेतील.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!