आर्णी येथील सर्वधर्म समभाव जपत सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदविणारा सामाजिक कार्यकर्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख यांची मुस्लिम वेलफेअर सोसायटी च्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
मुस्लिम वेलफेअर ही संस्था राज्यातील मुस्लिमांच्या मूलभूत हक्क अधिकार शिक्षण आरोग्य व राजकीय सामाजिक प्रश्ना वर काम करते.या संस्थेचे जाळे राज्य भर पसरले असून शासन दरबारी अनेक प्रश्नांची सोडवणूक करून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.
युनूस देख हे देखील आर्णी शहरात नाही तर संपूर्ण परिसर जिल्हा व राज्यात आपल्या मधुर समंध जोपासण्या साठी परिचित आहेत ते यवतमाळ जिल्हा शांतता समिती चे सदस्य व पोलीस मित्र म्हणून ओळखले जातात.
आर्णी येथे भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती ते साजरी करतात.त्या समिती चे ते अध्यक्ष देखील आहेत.
दि,१६/५/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सलीमभाई सारंगजी यांनी त्यांच्या नवी मुंबई वाशी येथील मुख्य कार्यालयात त्यांच्या सहकार्यांयांच्या उपस्थित शेख युनूस यांची मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड केली तसेच पुसद येथील डॉ. मोहम्मद झुबेर साहेब यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुकी पत्र व पुष्पगुछ देऊन निवड केली. त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंगजी व प्रदेशाध्यक्ष अजिज अब्बास पठाण यांचे शेख युनुस यांनी आभार मानून त्यांना धन्यवाद दिले
शेख युनूस यांनी मुस्लिम वेलफेअर असोसिएशन च्या निवडी चे श्रेय पात्र मित्र,सहकारी,चाहते, आणि सर्वच आर्णीकर यांना दिले,आपण या माध्यमातून केवळ मुदलीमच नाही तर सर्व समाजाच्या घटकांच्या सेवेसाठी सर्वांच्या सहकार्याने काम करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे पुढील वाट चालिस बोल महाराष्ट्र च्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा…!
प्रमोद कुदळे
संपादक बोल महाराष्ट्र