भारतीय क्रिकेट च्या इतिहासात अनेक रत्न झाले त्यात अगदी सुनील गावस्कर, कपिल देव पासून ज्याला क्रिकेट चा देव समजल्या जाते तो सचिन तेंडुलकर असे शेकडो हिरे भारतीय क्रिकेटला लाभले आहे. त्यात आता नव्या दमाचा शुबमन गिल या नवरत्ना ची भर पडली आहे.
आय पी एल मध्ये धावांचा पाऊस पडणारा गिल रोहित शर्मा व विराट ने निवृत्ती घेतल्याने कसोटी सामन्याचा कर्णधार झाला.इंग्लड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना गमवावा लागला तर दुसऱ्या सामन्याच्या वेळी शुबमन गिल चा वाढदिवस होता हा वाढदिवस द्वि शतक ठोकून साजरा केला.
टीम इंडियासाठी वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण करणारा शुभमन गिल आज 8 सप्टेंबर रोजी आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1999 साली पंजाबमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने फार कमी वेळात भारतीय क्रिकेट संघात अनेक यश संपादन केले आहे. त्यांच्या नावावर अनेक विशेष विक्रम नोंदवले गेले आहेत. अशा परिस्थितीत गिल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या यशावर एक नजर टाकूया.
2018 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलने भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. सेमीफायनलमध्येही त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. 19 वर्षाखालील वर्ल्ड कप 2018 मध्ये गिल टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्यानंतर त्याची विराट कोहलीशीही तुलना केली जात होती. गिलची खेळण्याची शैलीही कोहलीच्या खेळाशी जुळते. अंडर-19 क्रिकेटमधील यशस्वी कामगिरीनंतर गिल आयपीएल फ्रँचायझी केकेआरच्या नजरेत आला. त्याला मोठी रक्कमही मिळाली. 2018 मध्ये, केकेआरने त्याला 1.8 कोटी रुपये खर्च करून त्यांच्या टीमचा भाग बनवले.