कुकुट पालन हा नफ्याचा व्यवसाय आहे.कोंबडी जशी मासा साठी तसेच गावरान कोंबडी चे अंडी यास विशेष मागणी असते आरोग्यासाठी देखील अंडी खान्या विषयी डॉक्टर सुचवतात.गावरान कुकुट पालना सोबत गावरान कोंबडी ची अंडी विक्री हा सुद्धा फायदेशीर ठरते आहे.
ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनत असेल तर सर्वच गोष्टी शक्य होतात. असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. नशीबही अशा लोकांना साथ देते. त्यातच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने व्यवसाय करून यश मिळवल्याचा घटना विरळच. परंतु याला अपवाद ठरलाय सौरभ तापकीर. सौरभ ने आपल्या मेहनतीच्या जोरावर अंडी विक्री व्यवसायात प्रचंड यश मिळवलं आहे. यादरम्यान त्याने अनेक खडतर समस्यांना तोंड दिले. परंतु जिद्दीच्या जोरावर मात करीत त्याने आपला व्यवसाय उभा केला आहे. चला, तर मग जाणून घेऊयात सौरभच्या जिद्दीची गोष्ट.
असं करत करत एक कोंबडी म्हणता म्हणता शंभर कोंबड्या कशा झाल्या ते कळलं पण नाही. सौरभला ते नवीन दिसलं म्हणून तो करत गेला. त्यानंतर लोकांना माहीत झालं की सौरभकडे देशी कोंबड्यांची अंडी मिळतात. त्यामुळे त्याच्याकडे खूप लोक यायला लागली, पण तो देत नव्हता. तुमच्यासाठी ते एक अंड आहे, पण माझ्यासाठी ते एक पिल्लू आहे. मात्र कालांतराने त्याच्याकडे जास्त लोकं यायला लागली. त्यावेळेस त्याने लोकांना विचारलं की या अंड्याना एवढी मागणी का आहे. मग त्यांनी त्याला अंड्याचं महत्व सांगितलं. तेव्हापासून सौरभने विचार केला की, एक अंड्याचे दहा रुपये मिळतात. तर दहा अंडी विकली तर शंबर रुपये मिळतील. तेव्हापासून त्याने अंडी विकायला सुरुवात केली.
मामाच्या अंगणामध्ये हा सर्व प्रकार चालू होता. हळूहळू त्याला ते कळत गेलं की, देशी अंड्याना मागणी भरपूर आहे. त्यामुळं त्याने व्यवसाय वाढवायचा निर्णय घेतला. सौरभने मित्र आणि मामाच्या मदतीने परत १०० कोंबड्यापासून प्रवास सुरु केला आणि तो पोहचला १००० कोंबड्यांपर्यत. पुढे हे पण गावरान अंड्याचं उत्पादन कमी पडायला लागले, पण त्याला हे एकट्याला शक्य नसल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लोकांपर्यंत पोहचून त्यांना देशी कुकुटपालन व्यवसायाचे महत्व सांगत महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ दोन हजार कुकुटपालन फार्म चालू केले. त्याने या फार्ममधून अंडी घेण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या व्यवसायाचे ब्रॅण्डिंग करून पुण्यासोबतच मुंबईतही सोसायटीमध्ये जाऊन लोकांना पुरवतो. दिवसाला पन्नास देशी अंडी विक्रीचा सौरभचा हा प्रवास आत्ता पन्नास हजार अंड्यापर्यंत पोहचला आहे.