आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पूर्वी आर्णी तालुका काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षपदी बोरगाव येथील नरेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
आर्णी : आर्णी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी बोरगाव ग्राम पंचायत चे सरपंच नरेश फुलसिंग राठोड यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी २७ जून ला मुंबई प्रदेश कार्यालयात नरेश राठोड यांचा इंटरव्यू घेतल्यानंतर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले. बोरगाव सरपंच म्हणून राठोड यांची ही चौथी टर्म असून यापूर्वी २०१० ते २०१५ या कालावधीत काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. माजी तालुकाध्यक्ष सुनील भारती यांनी पक्षासाठी दिलेले योगदान महत्वाचे असून आपणही तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे व लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत करणार असल्याचे आपल्या नियुक्ती नंतर प्रतिक्रिया देतांना त्यांनी सांगितले. आपल्या नियुक्तीचे श्रेय ते प्रदेशाध्यक्ष मा.हर्षवर्धनदादा सपकाळ, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांचेसह काँग्रेसचे नेते, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देतात. नरेश राठोड यांच्या नियुक्तीने तालुका काँग्रेस मधे उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.