भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान खेळण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत सु स्थितीत असून पहिला सामना गमावल्या नंतर आता हा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न आहे.या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिल ची फलंदाजी बहरत असतांना इंग्लड च्या गोलंदाजा ची चांगलीच तारांबळ उडाली होती
भारताला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कमबॅकसाठी काहीही करून दुसरा कसोटी सामना जिंकणं भाग आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. टीम इंडियाने पहिल्या डावात दमदार खेळी केली आहे. पहिल्या दिवशी ५ गडी गमवून ३१० धावा केल्या. त्यानंतर दुसर्या दिवशीही भारताचे चांगली सुरुवात केली असून ३५० पार धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून शुबमन गिलच्या फलंदाजीला आणखी धार चढली आहे. शुबमन गिलचा आक्रमक अंदाज पाहून इंग्लंडच्या गोलंदाजांना धडकी भरली आहे. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी रडीचा डाव सुरु असल्याचं मैदानात पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स यांच्यात वाद झाला. कार्सचा रडीचा डाव पाहून कर्णधार गिल फलंदाजीवेळी नाराज दिसला.
पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताच्या डावातील 34 व्या षटकात हा प्रकार घडला. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स गोलंदाजी करत होता. चौथ्या चेंडू टाकत असताना त्याने गोलंदाजीवेळी विचित्र एक्शन केली. कार्सने रन अप करताना नॉन बॉलिंग आर्म हवेत उचलला. यामुळे शुबमन गिल संभ्रमात पडला. त्यामुळे त्याने चेंडू फेकण्याआधीच खेळपट्टीवरून बाजूला झाला. गिलने हा चेंडू खेळण्यास मनाई केली. कार्सने गिलने उचलेलं पाऊल पाहून आश्चर्य व्यक्त केलं. गिलने त्याची कृती पाहून तिथेच सुनावलं. मैदानातील पंचांनी शेवडी हा चेंडू डेड घोषित केला.