प्रहार शिक्षक संघटने मार्फत “सामाजिक दायित्व
प्रहार शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या अडचणीत उभी राहणारी शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना म्हणून नावारूपास आलेली आहे
दि.२१.११.२०२३ वार मंगळवार ला सामाजिक दायित्वाची जाण ठेवुन आपण समाजाचे देणे लागतो या भावणेतुन स्व.मातोश्री सुशिलाबाई नागपूरे वृद्धाश्रम आर्णी येथे प्रहार शिक्षक संघटना शाखा घाटंजीच्या वतीने वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लँकेट वितरण व दिवाळी सणाचे औचित्य साधून साडी भेट देण्यात आली. तसेच येथिल अनाथ बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. सदर वृद्धाश्रमात एकूण १०६ वृद्धासह अनाथ व दिव्यांग बालक सुद्धा वास्तव्यास असुन यामध्ये आणखी संख्या वाढत असल्याचे खुशालभाऊ नागपूरे यांनी सांगितले अल्प साधण समग्रीसह आपले सेवाकार्य अखंडीत पणे सुरू ठेवणार असेही त्यांनी म्हटले, त्याच बरोबर समाज सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी संघटनेमार्फत केलेल्या मदतीबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले.
*प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष .कुलदीप डंभारे यांनी वृद्धाश्रम संचालक .खुशाल नागपूरे यांचे त्यांच्या कार्याबददल कौतुक केले व पुढेही संघटने मार्फत सहयोग करण्यात येईल तसेच इतर समाज घटका मार्फत आपणास सहकार्य पोहचवू असे आश्वासित केले.. याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे,संजय करेवाड (जिल्हा उपाध्यक्ष) कपील टोणे (जिल्हा कोषाध्यक्ष) संतोष चौधरी (ता.सचिव घाटंजी) विनोद लोखंडे (ता उपाध्यक्ष घाटंजी ), शालीक धाबर्डे , वाहीद बैलिम आर्णी, वैशाली काकरवार (ता. संघटक महागाव),सम्राट खोब्रागडे (प्रहार सेवक )व इतर सदस्य उपस्थित होते