पोलीस गुन्हे दाखल करतील तुम्ही घाबराल का?असा सवाल करत रस्त्यावरून हटू नका से आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना केले
माझ्या कार्यकर्त्यांची कालपासून पोलिसांनीधरपकड केली पण माझे आंदोलन शेतकऱ्यांनी यशस्वी केले मला एकटे पडू दिले नाही असे राजू शेट्टी म्हणाले.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात ऊस आंदोलन पेटलं आहे. गेल्या वर्षीच्या ऊसाला चारशे रुपये द्या तसेच यंदाच्या उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी या मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित आहे. कोल्हापुरातून हातकणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको करत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे. जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उसाच एक कांडक देखील कारखान्याला जाऊ देणार नाही. तसेच हे पैसे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.