पुणे प्रतिनिधि –
नितेश विठ्ठल गाडगे
स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित (Chikhali) केलेल्या कृष्णागर प्रभागातील पेठ क्रमांक 18 छत्रपती शिवाजी पार्क येथील मुख्य रस्त्यावर काही महिन्यांताच खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामाचा दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कृष्णागर प्रभागातील पेठ क्रमांक 18 छत्रपती शिवाजी पार्क येथील मुख्य रस्ता काहीच महिन्यापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंटचा बनविला आहे. परंतु हे काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठविला.
मात्र, प्रशासन व ठेकेदारांनी दोघांच्या संगममताने व राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अत्यंत निकृष्ट कामाला अभय (Chikhali) मिळाले. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, चेंबर तुटले आहेत, ड्रेनेज लाईन व इलेक्ट्रिक केबलचे समस्या निर्माण होत आहेत. या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी/ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी. शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवानंद चौगुले यांनी केली आहे.