सर्वसामान्य माणसाच्या न्याया करीत दिव्यांग,शेतकरी, शेतममजुर ,कामगार व अन्यायग्रस्त नागरिकांच्या हक्कासाठी सदैव लढणाऱ्या सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने
व…प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विम्या साठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करणार
सोलापूर जिल्ह्यात यंदा सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्याबाबत शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळामुळे तालुक्याचे प्रचंड नुकसान झाले. पिके करपून गेली आहेत. त्यात तूर, मग , उडीद, सोयाबीन, कांदा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. शासनाने पीक विमा मंजूर केला आहे. त्याबाबत मा. जिल्हा अधिकारी साहेबांनी अधिसूचना काढून 2 महिने होत आले आहेत. तरीदेखील मंजूर झालेला 25% अग्रिम विमा पीक विमा कंपन्यां शेतकऱ्यांना द्यायला तयार नाहीत. तरी देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. काही भागात सोयाबीन चां पीक विमा मंजूर झाला असून जिल्ह्यातील महत्त्वाची पीके असलेले तूर , कांदा, मूग, उडीद ही पीक मुद्दामून विमा कंपनी कडून वगळण्यात आलेली आहेत. ह्या इतर पीकांचीही नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लेखी व तोंडी वारंवार पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसून येत नाही. त्यामुळे ज्वारी, उडीद, मूग, कांदा या वगळलेल्या पिकांचा समावेश करत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 11 डिसेंबर पर्यंत त्वरित पीक विम्याची रक्कम मंजूर करावी अन्यथा 12 डिसेंबर रोजी आपल्या कार्यालयासमोर प्रहार शेतकरी संघटना हलगी नाद आंदोलन करेल असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समनव्यक पंडित साळुंके यांनी दिला आहे. त्या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के, शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी , शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, संतोष कोळी, नितीन चव्हाण उपस्थित होते.*