मराठा आंदोलनाची धग अजूनही कायम असून ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे अशाच गाव बंदीचा फटका कलमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना बसला मराठा आक्रमक तरुणांनी बांगर याना काळे झेंडे दाखवत प्रचंड घोषणाबाजी केली त्यामुळे बांगर याना माघारी फिरावे लागले.
मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय मराठा आंदोलकांनी घेतला आहे. गावात कोणताही राजकीय कार्यक्रम घेण्यासही मराठा आंदोलकांचा विरोध आहे. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर येथे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनाला हजर राहण्यासाठी गद्दार आमदार संतोष बांगर आले. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे पाहताच पोलीस संरक्षणात आमदार बांगर यांनी तेथून पळ काढला. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.