चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार संघातून राज्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार हे निवडणूक लढवत असा कयास होता.कारण अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात असतील असा अंदाज बांधला जात होता.याही परिस्थितीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पक्षातील वरीष्ठ पातळीवर नेत्यांच्या गाठीभेटी सुरू ठेवला होत्या.मतदारसंघात देखील त्यानी अनेक उपक्रम राबविण्यास सुरवात करून विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती.पण कार्यकर्ते पदाधिकारी मात्र थोडे अस्वस्थ झाल्याचे चित्र होते पण आता खुद्द मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच लोकसभा निवडणुकीत इंटरेस्ट नसल्याचे सांगून ना म्हटल्यावर आता हंसराज अहिर यांच्या शिवाय आता भाजपला सहमत पर्याय नाही यामुळे अहिर समर्थक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठे उत्साहात असून
कहो दिलसे भैय्या फिरसे चा नारा देण्यास त्यानी सुरवात केली आहे.
