नुकत्याच जाहीर झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या राज्य कार्यकारणीत आर्णी येथील तिघांची वर्णी लागली त्याचे स्वागत करून त्यांना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शुभेच्छा दिल्या.
आर्णी नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते श्री. आरिज बेग मिर्झा यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारी नंतर प्रथमचआरिज बेग हे खा.प्रतिभा ताई यांच्या वरोरा जनसंपर्क कार्यालय येथे भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांना पुष्पगुच्छ देत हार्दिक खासदार ताईंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
मा. श्री. आरिज बेग मिर्झा हे दीर्घकाळापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कार्यकुशल नेतृत्वाची ओळख सर्वत्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राज्य पातळीपर्यंत त्यांनी नेहमीच लोकहिताचे कार्य प्राधान्याने केले आहे. त्यांचा अनुभव, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्य पक्षाच्या बळकटीस निश्चितच उपयुक्त ठरेल.असे मनोगत यावेळी खा.प्रतिभा ताई यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदावर त्यांच्या सारख्या अनुभवी, तळमळीच्या व कर्तबगार नेत्याची निवड होणं ही संपूर्ण काँग्रेस पक्षासाठी अभिमानास्पद बाब आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस श्रीमती माधुरीताई आडे, सचिव समिना शेख तसेच आर्णी काँगेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यात सुनील भारती, छोटू देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती परशराम राठोड,अमोल मांगूळकर,अशोक अग्रवाल,संजय ठाकरे,रियाज सैय्यदके .के.खान व अन्य उपस्थित होते.