बाबा कम्बलपोष र. अ. यांच्या उर्स शरीफ निमित्त बाबा कम्बलपोष दरगाह ट्रस्ट, आरणी द्वारा आयोजित सहा दिवस चालनार्या निशुल्क रोग निदान व उपचार शिबिरात एकून १६३४ रुग्णाचि तपासनी आली व त्या रुग्णाना औषध वाटप करण्यात आले.
यात प्रामुख्याने डॉ बाबर बेग मिर्ज़ा (जनरल फिजिशियन), डॉ अनिल आखरे (बालरोग तदन्य), डॉ विक्रम ठवकर (जनरल फिजिशियन), डॉ संदीप खंदारे (जनरल फिजिशियन), डॉ.निलोफर खान (स्त्री रोग तज्ञ), डॉ हार्दिक जैन (जनरल फिजिशियन), डॉ प्रफुल्ल गिरी (अस्थीरोग तज्ञ), डॉ अर्चना गजभिये (नाक कान घसा तज्ञ), डॉ पाशु शेख (मधुमेह तज्ञ), डॉ अंकित चिंतावार (अस्थिरोग तज्ञ), डॉ अरुण वाघ (जनरल फिजिशियन), डॉ देवेंद्र गावंडे (दंत रोग तज्ञ), डॉ राम पद्मावार (जनरल फिजिशियन), डॉ आलोक गुप्ता (मूलव्याध/फिशर तज्ञ), डॉ निजामुद्दीन अंसारी( (मूलव्याध/फिशर तज्ञ), डॉ रोहित मोहरे (जनरल फिजिशियन) आणि डॉ मनीष राठोड़ (जनरल फिजिशियन) यानी आपली सेवा दिली.
या सोबत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे व बाबा कम्बलपोष र. अ. दरगाह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सर्व रोग निदान व उपचार शिबिरात एकून ५५६ रुग्णाची तपासनी झाली. यातील ७६ रुग्णाची सर्जरी साठी वर्गीकरण करण्यात आले.
यात नेत्ररोग, मेडिसीन अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, सर्जरी विभाग यातिल डॉक्टर्स टीम सहभागी झाली होती.
प्रामुख्याने डॉ प्रफुल्ल वासनिक, डॉ गायत्री, डॉ इमरान, डॉ अपूर्वा दवे, श्री मुरलीधर उमाटे (मेडिकल सोशल वर्कर) आणि संपूर्ण टीम यानी आपली सेवा दिली.
या सोबत राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज कैंसर हॉस्पिटल, नागपुर आणि बाबा कम्बलपोष र. अ. दरगाह ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कैंसर रोग निदान शिबिरात एकून १३४ रुग्णाची तपासनी झाली व लक्षणे दिसणाऱ्या रुग्णाची पुढ़िल उपचारासाठी वर्गीकरण करण्यात आले. यात प्रामुख्याने डॉ मोहित आनी टीम, श्री संजय आमले (मेडिकल कैंप कोऑर्डिनेटर) यानी आपली सेवा दिली.
बाबा कम्बलपोष र. अ. दरगाह ट्रस्ट, आरणी च्या वतीने सहभागी सर्व डॉक्टर्स, रुग्णालये,मेडिकल्स आणि रुग्ण सेवकांचा मानवते प्रति त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.