अनेक बडे नेते सत्ताधारी भाजप मध्ये जात असताना आणि सर्वच राजकीय पक्षाला गळती लागल्याचे चित्र असतांना जळगावात मात्र या उलट चित्र पहायला मिळत आहे.जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप ने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून टी ठिकाणी माजी आमदार स्मिता वाघ पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उन्मेष पाटील व त्यांचे समर्थक नाराज होते.आणि त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी श्यक्यता वर्तविल्या जात होती पण अचानक उन्मेष पाटील हे मुंबई च्या दिशेने रवाना झाले असून ते मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश करतील आणि शिवबंधन बांधतील असा अंदाज आहे. जळगाव लोकसभेची जागा महा विकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटलेली आहे.