राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभाजन झाल्या नंतर आर्णी येथील राष्ट्रवादीचे माजी विधापरिषद सदस्य ख्वाजा बेग हे अजित पवार की शरद पवार यांच्या सोबत असा प्रश्न उपस्थित केल्या जात होता.नेमकीच चंद्रपूर आर्णी लोकसभेची निवडणूक सुरू झाली प्रचाराला देखील सुरवात झाली.
आर्णी तील शाम मानव यांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने काँग्रेस उमेदवार प्रतिभाताई धानोरकर व ख्वाजा बेग एका व्यासपीठावर उपस्थित होते यावरून बेग महा विकास आघाडी च्या सोबत रहातील असा कयास होता पण त्या नंतर महा युतीचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा आर्णी येथे मेळावा पार पडला त्यात पोस्टर बॅनर वर ख्वाजा बेग यांचा फोटो असल्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. सोशिअल मीडियात देखील कुजबुज सुरू होती मात्र तीन दिवसांपूर्वी धानोरकर यांच्या प्रचार नियोजनासाठी झालेल्या बैठकीस ख्वाजा बेग यानी उपस्थिती लावली व सुधीर मुनगंटीवार हे काही काळ विधिमंडळ सभागृहात एकत्र काम केल्याने चहा घेण्यासाठी आपल्याकडे आले होते महायुती च्या पोस्टर वर आपला फोटो कोणी टाकला हे माहीत नाही पण ज्या बाप माणसाने आपल्याला राजकारणात संधी दिली तो अडचणीत असतांना त्यांची साथ मी सोडणार नाही असे वक्तव्य करून महा विकास आघाडी सोबत आपण असल्याचे संकेत दिले.
शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आले असता नागपुरात ख्वाजा बेग यांनी त्यांची भेट घेतली यावेळी विदर्भातील लोकसभा जागे बाबत माहिती व आढावा पवार यांनी घेऊन ख्वाजा बेग यांना महत्वपूर्ण सूचनाही केल्याचे समजते.या भेटी दरम्यान तालुका अध्यक्ष हरीश कुडे उपस्थित होते.