राज्यात केवळ लोकसभेच्या ४८ जागा आहेत पण महा युती आणि महा विकास आघाडीच्या पक्षात घुसफूस सुरू असल्याने जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.शिवसेना सोडून बंड केल्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार होते त्यापाठोपाठ १३ खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले.पण आता दोन हेमंत अडचणीत सापडले आहेत आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची खंत देखील त्यांचे समर्थक व्यक्त करतांना दिसत आहेत.जेव्हा हे विद्यमान खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले तेव्हा सर्वांना उमेदवारी मिळेल असा शब्द होता .पण आता भाजप च्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ एकनाथ शिंदे गटावर आलेली दिसते आहे.
नाशिक मधून हेमंत गोडसे हे उमेदवार असतील अशी घोषणा मुख्यमंत्री पुत्र खा.शिंदे यांनी केली होती तेथूनच थोडी कुरबुर सुरू झाली आणि आता थेट दिल्लीतुन भाजप ने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू केल्याने गोडसे समर्थक नाराज आहेत.तर दुसरीकडे हिंगोली ची उमेदवारी हेमंत पाटील याना जाहीर झाली तरी भाजप मधून त्याना मोठा विरोध असल्याने त्यांचीही उमेदवारी बदलण्याची हालचाल सुरू असल्याचे समजताच हेमंत पाटील समर्थक मुंबई कडे निघाले आहे.
साध सोडून उपयोग नाही,नाराज झाल्या भावना ताई…
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना साथ देऊन काहीच उपयोग नाही असे म्हणण्याची वेळ खासदार भावना ताई गवळी याच्यावर आलेली आहे.