आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्य सभा सदस्य संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन दिला त्यामुळे आता संजय सिंह हे लोकसभेचा प्रचार करू शकतील
अदानी प्रकारणा वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर सडेतोड टीका करणाऱ्या संजय सिंग यांना दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी ने अटक केली होती. गेल्या सहा महिन्या पासून ते तुरुंगात होते. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आप चे नेते सतेंद्र जैन हे देखील तुरुंगात आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही याच प्रकरणात अटक झालेली आहे.