7k Network

मारेगाव शहरासह वणीत ही पाणी टंचाईच्या झळा, मनसे आक्रमक

मारेगाव शहरासह वणीत ही पाणी टंचाईच्या झळा, मनसे आक्रमक

▪️मलमूत्र युक्त पाणी पुरवठा बंद करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी

 

वणी / प्रतिनिधी:
उन्हाची दाहकता वाढत चालल्याने उपविभागात मारेगाव शहरासह वणी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात पाणी टंचाईच्या प्रश्नांवर पर्यायी व्यवस्था काढून टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा व दूषित पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी वणी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.

 

शहराची जीवदायिनी असलेल्या निर्गुडा नदी सभोवतालच्या परिसरातील मलमूत्र , गटार व संडास चे पाणी सरळ नदीत सोडण्यात येत असून ते पाणी फिल्टर प्लांटला येते व फिल्टर प्लांट मृत अवस्थेत असल्याने यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. पाणी पुरवठा विभाग त्यात केवळ गरजेपेक्षा जास्त क्लोरीन पावडरचा वापर करून पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पाठवत आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,

“गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. त्यातच जे पाणी येत आहे ते पिण्यायोग्य नाही. पाण्याला दुर्गंधी येत असून ते मलमूत्रयुक्त आहे. यामुळे नागरिकांमध्ये उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. नगर परिषदेने याची तातडीने दखल घ्यावी आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल. असा इशारा नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला आहे.

 

नागरिकांनीही दूषित पाण्यामुळे होत असलेल्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून ही समस्या कायम असून नगर परिषद यावर कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निवेदन देते वेळी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, मयूर घाटोळे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, दिलीप मस्के, वैशाली तायडे, मेघा तांबेकर, हिरा गोहोकार, संकेत पारखी, जुबेर खान, विनेंद्र गर्डे, विजय चोखारे, कृष्णा कुकडेजा यांच्यासह शहरातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

 

अमृत योजना प्रलंबित –
शहराची पाणी टंचाईचे समस्या कायम मार्गी लागावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने अमृत योजना राबविण्यात येत आहे. याकरिता १४२ कोटी रुपयाचा निधी सुद्धा नगर परिषदेला शासनाकडून देण्यात आला. मात्र ह्या कामात बऱ्याच दिवसापासून दिरंगाई होत असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न अधांतरी राहत आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!