भारतातील कश्मीर खोऱ्यातील पूलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला पहाता भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्थान च्या दहशतवादी व त्याला समर्थन देणाऱ्या भूमीला संपवण्याची वेळ आली आहे म्हणत कडक इशारा दिला होता.तसेच जागतिक पातळीवर पाकिस्तान ला एकटे पडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केले.
भारतीय सैन्य दलास खुली सूट देण्यात आली असून आता कुठल्याही परवानगी शिवाय तिन्ही सैन्य दल कधीही पाकिस्तान विरुद्ध कारवाई करू शकतात.सीमेवरील वाढता तणाव भारताच्या कारवाई च्या तयारीने बिथरलेल्या पाकिस्थानी नेते विविध बेताल वक्तव्य करत आहे.
घाबरलेल्या पाकिस्तान नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न नेत्या कडून केल्या जात आहे.
लाहोर येयील एका कार्यक्रमात पाकिस्तान चे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियन नवाज हिने म्हटले की पाकिस्तान वर सहसा कोणीच हल्ला करू शकत नाही कारण जगाला माहीत आहे की पाकिस्तान जवळ अनुबाँब आहे.त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे त्या म्हणाल्या दहशतवादी हल्ल्या बाबत साधा निषेध देखील न नोंदवता मरियन यांनी पहिल्यांदा तोंड उघडले.
नवाज शरीफ आशावादी:
भारताचे आक्रमक रूप पहाता पाकिस्तान चे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दोन्ही देशांनी युद्धाचा मार्ग न अवलंबता शांतीपूर्ण चर्चा करावी असे मत व्यक्त केले.मात्र त्यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष नेते यांनी नवाज शरीफ व नरेंद्र मोदी यांच्यातील मधुर समंध यापेक्षा देश मोठा आहे असे पाकिस्तान च्या विरोधी पक्षांनी बजावले आहे.
पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियन शरीफ यांनी केलेले वक्तव्य एक प्रकारची भारतास पोकळ धमकी मानली जाते.अल्लाह च्या कृपेने आमच्या जवळ आटोनॉमिक शक्ती असून अणुबाँब असल्याने कोणीही हल्ला करण्या आधी दहा वेळा विचार करेल असेही मरियन म्हणाल्या.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवत ब्रिटन ने भारताला पाठिंबा दिला पण सुरवातीला भारताला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने आपले दुतोंडी भूमिका घेत दोन्ही देशाने सामोपचाराने घवें असे म्हटले आहे.