फळांचा राजा म्हणजे आंबा,भारतीय विशेष करून कोकण देवगड चा हापूस आंबा विदेशातही प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध या आंब्या ची चव अतिशय रुचकर असते व किंमत सुद्धा प्रतवारी नुसार ठरली जाते.
मुंबई बाजारात ग्राहक हापूस ची वाट पहात असतात. फळात सर्वाधिक संशोधन फक्त आंबा या फळात झाले असून सर्वाधिक प्रकार भारतात विकसित झाले आहेत.शेजारच्या आंध्रप्रदेश व दक्षिणेतल्या राज्यात मोठया प्रमाणात संशोधित आंबा आढळून येतो.
राज्यात सोलापूर जिल्ह्यात एक फूट लांबी व ३ किलो चा आंबा फळ शेतकऱ्यांने विकसीत केला आहे. अन आपल्या नेत्या वरील प्रेमा पोटी त्याने राज्याचे जेष्ठ नेते खा.शरद पवार यांचे नाव दिले “शरद मँगो”
फळांचा राजा आंब्याचा हंगाम सध्या सुरू आहे. हापूस, पायरी, रायवळ केशर बदाम,गावरान अशा अनेक प्रकारातील आंबे बाजारात आले आहेत. आंब्याचे दर वाढले असे म्हणत सर्वच जण आंबे खातात कारण तीन ते चार महिनेच हा आंब्यांचा हंगाम असतो. महाराष्ट्रातील सोलापूरमधील एका बागेत तब्बल तीन किलोचा आंबा लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावातील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी त्यांच्या बागेत आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करून तीन किलो वजनाचे आंबे पिकवले आहेत. या तीन किलोच्या आंब्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यांनी या आंब्याचे नाव ‘शरद मँगो’ असे ठेवले आहे. याबद्दल माहिती देताना शेतकरी दत्तात्रय घाडगे म्हणाले की, या आंब्याचे वजन तीन किलो आहे. जगात सर्वाधिक किंमत असलेला आंबा म्हणजे मियाझाकी आंबा हा चीन मध्ये पिकतो आता तो जगभर पिकवल्या जातो त्याची किंमत १० हजार रुपये प्रतिकिलो एवढे असू शकतात.