महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे समृद्ध राज्य:वैशाख वाहुरवाघ
१ मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा पासून हे राज्य देशाला दिशा देणारे राज्य म्हणून ओळखल्या जाते असे प्रतिपादन आर्णी चे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ साहेब यांनी व्यक्त केले ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभ झाल्यावर कार्यक्रमात बोलत होते.
रोजगार हमी योजना,अंधश्रद्धा निर्मूलन कायदा ,कामगार कायदा असो की कुठलाही पुरोगामी निर्णय या राज्यात सर्वप्रथम अंमलात आणल्या गेला असेही म्हणून यावेळी त्यांनी उपस्थित नागरिक कर्मचारी वृंद व पत्रकार यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ही संतांची भूमी:अर्जुन पावरा साहेब
उपविभागीय अधिकारी आर्णी
महाराष्ट्र राज्य हे समृद्ध व संपन्न राज्य आहे ही संतांची भूमी असून औद्योगिक,सजैक्षणिक व सांस्कृतिक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असल्याचे मनोगत महसूल उपविभागीय अधिकारी आर्णी उपविभाग अर्जुन पावरा साहेब यांनी व्यक्त केले.त्यांनी ही यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा उपस्थित नागरिकांना दिल्या
१ मे रोजी सकाळी तहसील कार्यालय पटांगणात अर्जुन पावरा साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी आर्णी पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजास मांवनदना दिली व राष्ट्रगीता नंतर तहसील कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली यावेळी त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा साहेब आर्णी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ साहेब आर्णी चे पोलीस निरीक्षक सुनील नाईक साहेब सहाय्यक पोलीस निरकीक्षक तेलगोटे नायब तहसीलदार उदय तुंडलवारसाहेब
उपस्थित होते यावेळी पत्रकार हरिओम बघेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक बांधकाम उपअभियंता घोडेराव साहेब अभियंता पांडे साहेब पत्रकार संघ अध्यक्ष आबीद फानन, प्रेस क्लब अध्यक्ष आरिफ खान, हरिओम बघेल परवेज बेग, आरिफ खान , अनिल इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते
आभार प्रदर्शन नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने साहेब यांनी व्यक्त केले
तलाठी राजेंद्र चौधरी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.