खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.
अरुणावती नदीत धरणातून पाणी सोडणार.
अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिले आहे. कडाक्याच्या उन्हात सर्वत्र तीव्र पाणी टंचाई जाणवत असून घरगुती उपयोगाकरिता, जनावराकरिता व शेतीकरिता लागनाऱ्या पाण्याअभावी आर्णी व घाटंजी तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरीक हवालदिल झाले आहे. अरुणावती नदी काठावरील नागरिकांनी धरणातून पाणी सोडण्याकरिता प्रयत्न करावे अशी विनंती विभागाच्या खासदार प्रतिभाताई द्यानोरकर यांना केली होती. या मागणीची खासदार प्रतिभाताई द्यानोरकर यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेशी दिनांक २२ एप्रिल ला यवतमाळ येथे बैठक लाऊन लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली व जिल्हाधिकारी यांनी पाणी सोडण्याबाबत कार्यवाही सुरू केली. पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीत पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या. १ मे च्या जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात तालुक्यातील सायखेडा,लिंगी, चिकणी, भंडारी, महाळूगी, काठोडा, आमनी, आसरा, विठोली, अंतरगाव, केळझरा, येरमल, हेटी, शिवर, पळशी या गावांची पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या विनंतीवरून अरुणावती धरणातून आरक्षित २ द.ल.घ.मी. पाण्यापैकी १ द.ल.घ.मी.पाणी सोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. २ मे ला सकाळी पाणी सोडणार असल्याचे अरुणावती पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आल्याने पाण्याची आतुरतेने वाट पाहत असलेले गावकरी आनंद व्यक्त करीत आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी २२ एप्रिल ला जिल्हाधिकारी यांचेशी बैठक झाल्यानंतरही हा विषय लाऊन धरला. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद व अरुणावती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ पाठपुरावा सुरूच ठेवला. २८ एप्रील ला आर्णी तालुका आढावा बैठकीत या कामाला गती देण्याच्या सुचना गट विकास अधिकारी, अरुणावती प्रकल्प चे अधिकारी व इतर संबंधितांना दिल्या. १ मे ला या विषयावर जिल्हाधिकारी यवतमाळ यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी असे खासदारांनी आर्णी येथील काँग्रेस पदाधिकारी यांना सांगितले त्यानुसार आर्णी कृ.उ.बा. समितीचे सभापती अनिल आडे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग मिर्झा, माजी नगरसेवक छोटू देशमुख, उपसभापती परसराम राठोड यांनी जिल्हाधिकारी विकास मीना व निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला सूचना केल्या त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी सुधारित प्रस्ताव (मागणी) गट विकास अधिकारी, आर्णी यांचेकडून मागवून जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला व जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले. ही सर्व प्रक्रिया शासकीय सुट्टी असतांनाही प्रशासनाने एकाच दिवसात पार पाडली.