भारत पाकिस्तान च्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढल्याने आय पी एल संघातील विदेशी खेळाडूंना तातडीने त्यांच्या देशात पाठविण्यात आले पण आता शस्त्र संधी झाल्याने भारतीय नियामक मंडळ व क्रीडा मंत्रालयाने निर्णय घेऊन आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने खेळण्यासाठी निर्णय घेतला असून जे तगडे संघ आहेत त्यात विदेशी खेळाडूंचा भरणा आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढल्यानंतर आयपीएल 2025 स्थगित करण्यात आली होती. गुरूवारी पंजाब आणि दिल्ली यांच्यातला सामना अर्ध्यातच थांबवला गेला, यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू, कोचिंग स्टाफ तसंच कर्मचाऱ्यांना धर्मशालामधून स्पेशल वंदे भारत ट्रेनने दिल्लीला आणण्यात आलं. दोन्ही देशांमधला तणाव वाढलेला असतानाच बीसीसीआयने शुक्रवारी आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.भारत-पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढल्यानंतर आयपीएल 2025 स्थगित करण्यात आली होती. गुरूवारी पंजाब आणि दिल्ली यांच्यातला सामना अर्ध्यातच थांबवला गेला, यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू, कोचिंग स्टाफ तसंच कर्मचाऱ्यांना धर्मशालामधून स्पेशल वंदे भारत ट्रेनने दिल्लीला आणण्यात आलं. दोन्ही देशांमधला तणाव वाढलेला असतानाच बीसीसीआयने शुक्रवारी आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल स्थगित झाल्यानंतर आरसीबीचे ७ परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परतले आहेत. आरसीबीशिवाय मुंबई इंडियन्स, केकेआर आणि लखनऊचे परदेशी खेळाडूही त्यांच्या मायदेशात परतले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएलचे उरलेले सामने पुढच्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे, पण आता मायदेशात गेलेले परदेशी खेळाडू आयपीएल खेळायला परत येणार का? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.आयपीएल स्थगित झाल्यानंतर आरसीबीचे 7 परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परतले आहेत. आरसीबीशिवाय मुंबई इंडियन्स, केकेआर आणि लखनऊचे परदेशी खेळाडूही त्यांच्या मायदेशात परतले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएलचे उरलेले सामने पुढच्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे, पण आता मायदेशात गेलेले परदेशी खेळाडू आयपीएल खेळायला परत येणार का? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.