7k Network

पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे विशाल तिरंगा रॅली…!

पहलगाम येथे पाकिस्तान च्या दहशतवादी हल्ल्यात आमचे २६ निष्पाप पर्यटक मृत्यू मुखी पडले होते त्यानंतर देशात चिड निर्माण झाली व भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान च्या नहू ठिकाणी हवाई हल्ले करून दहशतवादी ठिकाण नाहीसे केले तीन दिवस आमचे सैनिक प्राणाची बाजी लावत लढत राहिले.या वीर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी यवतमाळ शहरात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली.

 

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. भारताने तत्काळ ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान अल-मरसूस’ अंतर्गत भारतातील विविध शहरांवर हल्ले करून संघर्ष अधिक तीव्र केला.

या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी आयोजित तिरंगा रॅली सीझफायरमुळे स्थगित करण्यात आली. मात्र, शिवसेना यवतमाळच्या वतीने देशसेवेचे कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

शिवतीर्थ, यवतमाळ येथे माजी सैनिकांना पुष्पगुच्छ आणि गौरवचिन्ह देऊन त्यांचा मानपूर्वक  ना.संजय राठोड यांनी सत्कार केला. हा केवळ एक कार्यक्रम न रहाता,  राष्ट्रसेवेच्या प्रेरणेचे एक उदाहरण ठरले.

या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवर, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, तसेच सौ. वैशाली मासाळ आणि विशाल गणात्रा यांची उपस्थिती लाभली होती. शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व अनेक नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

I

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!