देशात युद्धजन्य स्थिती पाहता सुरू झालेला दिल्ली पंजाब मधील आयपीएल चा टी ट्वेन्टी सामना सुरू होऊन दहा ओव्हर्स चा खेळ झाल्यावर थांबवून रद्द करण्यात आला होता.दोन्ही संघाला गुण देखील देण्यात आले नव्हते.मात्र दिल्ली व पंजाब दोन्ही संघ अंतिम चार मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ मानले जातात.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. एका आठवड्यामध्ये परिस्थिती सुधारेल, असं बीसीसीआयला वाटत आहे, त्यामुळे त्यांनी खेळाडूंना तयार राहायला सांगितलं आहे. गुरूवारी धर्मशालामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला सामना सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित केला गेला होता.