आज लहान मूल मोबावइल वर अधिक गुंतलेले दिसतात.त्यामुळे त्यांचे इतर खेळा वरून लक्ष उडालेले आहे.
अशात बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणून बुद्धिबळ खेळ खेळल्या जातो. देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बुद्धिबळ खेळ प्रसिद्ध आहे.अशीच एक बुद्धिबळा ची स्पर्धा आयोजित
करण्यात आली होती त्यात लक्षदीप ठाकरे या शालेय विद्यार्थ्याने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकवला.
यवतमाळ येथील जी.एम.रायसोनी मेमोरियल यवतमाळ येथे झालेल्या ओपन बुद्धीबळ स्पर्धा २०२५ मध्ये जिल्हा परिषद प्रार्थमिक मराठी शाळेतील तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी लक्षदीप अक्षय ठाकरे याने नव वर्ष वयोगटातील मुलांमधून जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.या यशाचे श्रेय तो शिक्षक वृंद व आई वडिलांना देतो