सर्वोच्य न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणारे महाराष्ट्र विदर्भ सुपुत्र न्या.भूषण गवई यांचा मुंबई उच्च न्यायालयाने बार काँसिल तर्फे सत्कार घेतला होता.
न्या.भूषण गवई हे मुख्य न्यायाधीश झाल्यावर पहिल्यांदा राज्यात आले पण प्रोटोकॉल नुसार मुख्य सचिव,पोलीस महा निरीक्षक,मुंबई पोलीस आयुक्त किंवा राज शिष्टचार म्हणून मुख्यमंत्री अथवा कुठलाही राज्य सरकार मधला मंत्री त्यांच्या स्वागताला आला नाही. एरवी विधानसभा सदस्य काही अवमान झाला तर हक्क भंगा च्या बाता करतात.
पण न्यायमूर्ती भूषण दादासाहेब गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की ” मला प्रोटोकॉल वैगेरे काही नको” माझ्यासाठी व देशाच्या प्रत्येका साठी संविधान सर्वोच्च आहे., यातून ते काही ऐतिहासिक निर्णय देतील त्यामुळे राज्य घटना,लोकशाही व संविधाना वरचा विश्वास अधिक दृढ होईल.
दिल्लीत परतल्यावर न्या.,भूषण गवई यांनी एक आसूड ओढला तो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री माजी महसूलमंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर
१९९८ ला नारायण राणे राज्याचे महसूल मंत्री असतांना पुणे येथील वन विभागाची २९ एकर जमीन जी महसुल विभागाच्या ताब्यात होती ती जमीन अकृषक करून मर्जीतल्या बिल्डरला देऊन लाभ घेतला. हा प्रकार म्हणजे पदाचा गैरवापर होतो म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले.व तीन महिन्यात ती सर्व जमीन परत वनविभागास परत करण्याचे आदेश दिले.
यामुळे खा.नारायण राणे व तत्कालीन पुणे महानगरपालिका आयुक्त व इतर चांगलेच अडचणीत आले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.