जगात सर्वाधिक क्रिकेट चे वेड व आवड असणारे रसिक भारतात आहेत या खेळात चांगली कामगिरी करणाऱ्यास देवा ची पदवी दिल्या जाते जसे की सचिन तेंडुलकर
भारतीय क्रिकेट च्या इतिहासात अनेक नामवंत खेळाडू झाले अनेक विक्रमविर झाले.त्यांचे आजही नाव आदराने घेतले जाते.त्या पैकी एक म्हणजे कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विदेशाच्या भूमीत विश्व चाचक जिंकला होता.
क्रिकेट चे दुसरे नाते असे की हा खेळ गोऱ्या साहेबांचा म्हणजे भारतावर १५० वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांचा म्हणून या खेळात जिंकणे फार अभिमानाचा क्षण असतो.
आता भारतीय संघ इंग्लंड ला जात आहे तेथे खरी कसोटी आहे कारण भारताचा कर्णधार व स्टार फलंदाज रोहित शर्मा ने अचानक कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.त्याच बरोबर ज्याची फलंदाजी विराट आहे तो विराट कोहली यानेही निवृत्ती घेतली त्यामुळे अनुभवी खेळाडू नसल्याने संघ दुबळा होतो की काय असा प्रश्न पडला पण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व निवड समितीने नवोदितांना संधी देऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्या पूर्वीच कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रोहित शर्मा नंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता. अखेर आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला असून शुबमन गिल च्या खांद्यावर कर्णधार पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.