7k Network

४ दिवसीय कोया पुनेम संगीत गाथा कार्यक्रमाचा शानदार समारोप

४ दिवसीय कोया पुनेम संगीत गाथा कार्यक्रमाचा शानदार समारोप

कलश शोभायात्रा उद्घाटन बाळासाहेब मांगुळकर यांचे हस्ते
मा.प्रा.वसंतराव पुरके
मा.प्रा.राजुभाऊ तोडसाम यांची उपस्थिती

निसर्ग संवर्धन पुर्वजनाची शिकवण

कर्म म्हणजे धर्म

केपीजिएस ने समाजाचे परिवर्तन घडवून आणला.

दारु सोडा समाज जोडा

यवतमाळ – निसर्गावर प्रेम करायला शिकवणारे गोंडी धर्माचे धर्म गुरू पंहादि पारी कुपार लिंगो यांचे तत्वज्ञान प्रसार करणारी कोया पुनेम गोटुल समितीच्या ७ वर्धापनदिनानिमित्त दि.६,७,८ व ९ जुन रोजी कोया पुनेम संगीत गाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
६ जुन ला भिमालपेन पेनठाना वाघापूर येथुन कलश शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचे उद्घाटन मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार याचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कलश यात्रेत महात्मा राजा रावण,जंगो रायताड, राणी दुर्गावती, बाबुराव शेडमाके यांचे देखाव्यांनी डोळ्यांचे पारणे फेडले.कलश शोभायात्रेत परिवारासह सगाबांधव उपस्थित होते. मिनाक्षीताई वट्टी यांचे वतीने शोभा यात्रेत शरबत वाटप करण्यात आले.
७ जून ते ९ जुन पुनेमाचार्य शंकरशहा ईरपाचे यांचा कोया पुनेम संगीत गाथा कार्यक्रम गुरुदेव मंगल कार्यालय दारव्हा रोड झाला.
त्यांनी कोयागण उत्पत्ती, पहांदि पारी कुपार लिंगो जन्म,८८ शंभु सेक,रायताड जंगोदाई,महात्मा राजा रावण,कचारगड येथील कंली कंकाली व हिरा सुका सुकाचार्य यांची माहिती संगीत गाथेत सांगितली.
३ दिवस आदिवासी समाज बहुसंख्येने उपस्थित होते.यामध्ये यवतमाळ,पांढरकवडा , घाटंजी,नेर,वणी, राळेगाव,मारेगाव समावेश होतो. यामध्ये दशरथजी मडावी,सुरेश कन्नाके, गुलाबराव कुडमेथे,राजु चांदेकर,प्रा.निनाद सुरपाम,भाऊराव मरापे,पि.एल.कुमरे,नरसिंह कुमरे, सुवर्णा वरखडे, माया मरसकोल्हे,प्रविण मडावी, सेवा दाते गजानन पोयाम, पुंडलिक मसराम ,अविनाशजी सुरपाम उपस्थित होते.
९ जुन ला कोया पुनेम संगीत गाथा कार्यक्रम चा समोरोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा.वसंतराव पुरके होते तर प्रमुख पाहुणे राजु भाऊ तोडसाम आमदार केळापूर,नारायणराव मरसकोल्हे, तपस्वी दशरथजी ताडाम,भुमक महासंघाचे प्रल्हादराव सिडाम, मुरलीधर टेकाम होते.यावेळी राष्ट्रीय पुनेमाचार्य शंकरशहा ईरपाचे,भुमक विमानशहा ककोडिया,ढोलक मास्टर पंचलाल धुर्वे,पेड मास्टर मनोहर इबनाती,बॅजोमास्टर झनकलाल धुर्वे यांचा पहांदि पारी कुपार लिंगो प्रदान करून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा.वसंतराव पुरके यांनी निसर्ग संवर्धन पुर्वजनाची शिकवण आहे आपल्या संस्कृतीत कर्माला धर्म मानले जाते. दारु सोडा समाज जोडा आहे आवाहन करून कोया पुनेम गोटुल समिती ने समाजाचे परिवर्तन घडवून आणले असे म्हणाले.
यावेळी कोया पुनेम गोटुल समिती राज्य अध्यक्ष प्रल्हादराव सिडाम राज्य सचिव किशोर उईके जिल्हा अध्यक्ष गुलाबराव मेश्राम सचिव लक्ष्मणराव कुळसंगे पदाधिकारी प्रशांत सोयाम, गजानन कोटनाके, दिलीप मसराम, गुलाबराव घोडाम, विनोद मडावी,बाबाराव कुळसंगे,राजेश मडावी,अजय घोडाम,कृष्णा पुसनाके,अजय उईके, पुरुषोत्तम मडावी, गजानन ईडपाते,माणिकराव तोडसाम, पवनकुमार आतराम,स्वाती मडावी सदस्य अनिता मरसकोल्हे, शारदा उईके,उषा मेश्राम,वसंतराव कंगाले, राजु कुडमते,किसनराव किनाके,गुलाबराव घोडाम, विष्णुपंत मसराम, मनोहर मसराम,प्रभात कनाके, योगीता मडावी,स्नेहलता सिडाम,निकिता उईके, नरेश उईके,विनोद उईके,शारदा उईके,भारत गेडाम, ज्ञानेश्वर उईके,दामोदर उईके, राजेंद्र मडावी, आदिवासी समाज संघटनेचे दिलीप शेडमाके, भिमराव मरसकोल्हे,प्रफुल कोवे,शंकर कोटनाके,शरद उईके, संजय मडावी,भारत मडावी,बाळु वट्टी भगवान जुमनाके, राहुल कुमरे, नरेंद्र किनाके तथा आदिवासी समाजाच्या संघटना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.असे प्रसिद्ध प्रमुख कृष्णा पुसनाके यांनी कळविले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!