मी संवाद दौऱ्यावर नांदेड असतांना बंजारा समाज बांधवांना संबोधित करत होतोत्यावेळी मी म्हटले की राजकारणात वरीष्ठ पातळीवर प्रत्येक बाबतीत त्यांचे मतभेद नसतात. यावेळी काहि लोकांचे मी नावे घेतली त्याचा विपर्यास करून माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रकाशित केले माझे नेते शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महा युतीत चांगले काम करतो ही काहींची अडचण असल्याने ते चुकीच्या बातम्या पेरतात असे म्हणत आपण काहीच चुकीचे बोललो नाही असेही यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांनी म्हटले आहे.
