7k Network

यवतमाळ येथे शस्त्र साठा जप्त,घातपाताची तयारी असल्याची व्यक्त होत आहे शंका…!

यवतमाळ म्हटले की हे शहर टोळीयुद्ध व गुन्हेगारी साठी कुप्रसिद्ध आहे.येथे लहान सहन कारणासाठी दिवसा ढवळ्या खून होतात असे चित्र होते पण गेल्या अनेक दिबसपासून शहर शांत होते कारण जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता गुन्हेगारी व गुन्हेगारा वर बारकाईने लक्ष देऊन असतात.: जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पाच अग्निशस्त्रे, धारदार तलवार, ३५० जिवंत काडतुसे, बुलेटप्रूफ जॅकेटसह एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवायांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

पहिल्या घटनेत रणवीर वर्मा (३०, रा. दर्डा नगर, यवतमाळ) हा पांढरकवडा रोडने मोपेडने जात असताना पोलिसांनी त्याला अडवून झडती घेतली. त्याच्याकडील पोत्यात पाच अग्निशस्त्रे, ३५० जिवंत काडतुसे, एक तलवार, बुलेटप्रूफ जॅकेट व इतर साहित्य आढळून आले.

या कारवाईत सात लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रणवीर याने ही शस्त्रे कामरान अहमद (रा. देहरादून, उत्तराखंड) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. कामरान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात दिल्लीसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!