मनसे चे प्रवक्ते व स्व.प्रमोद महाजन यांचे बंधू व मनसे चे जेष्ठ नेते व प्रवक्ते प्रकाश महाजन हे नाराज झाले होते त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर व युवा नेते अमित ठाकरे यांनी फोन केला त्यामुळे आता या जेष्ठ नेत्यांची नाराजी दूर होईल असे बोलल्या जाते.
मनसेचं नाशिकमध्ये राज्यस्तरीय शिबीर सुरू आहे. मात्र, या अधिवेशनासाठी आपल्याला बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘पक्षाने साथ दिली नाही, पक्षाची सध्या दिवाळी सुरू आहे, पण माझ्या घरी अंधार आहे, पक्षात किंमत नाही. तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?’, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.