ज्ञानदानाचा उजेड ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नितीन मिर्झापूरे मित्रपरिवार व राजमुद्रा प्रतिष्ठानचा शालेय साहित्य वाटप उपक्रम”
वाई (रुई),ता.यवतमाळ,दि.१६ जुलै :
“शिक्षण हेच खरे समृद्धीचे शस्त्र” या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत नितीनदादा मिर्झापूरे मित्रपरिवार,यवतमाळ व राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रुई (वाई) व वाई येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण ४० ग्रामीण विद्यार्थ्यांना दिनांक १५ जुलै (मंगळवार) रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पेन,पेन्सिल,शार्पनर,खोडरबर,पाच वह्या आणि स्कूल बॅग देण्यात आल्या.उपक्रमात शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी ही “ज्ञानाची शिदोरी” ठरणार आहे,असा विश्वास कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आला.
रुई (वाई) येथील कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक दर्शन बेंद्रे,कल्पना करनाईक,नम्रता निकम,मुजाहिद खान,तर वाई येथील कार्यक्रमाला मुख्याध्यापक हिम्मत ठाकरे,संजीवनी कांबळे,अनिता आगे,तिलोत्तमा ठाकरे,अनिता आंबिलकर आदी शिक्षक उपस्थित होते.
गावांतील सुमित गावंडे,नितीन जुनघरे,जागेश्वर साखरकर, अनिकेत भागडकर,चंदू भारती, अश्विन ठाकरे,प्रमोद तोरकडे, कुंदन नागदेवते,निशांत वाघमारे, अमन राऊत,आदी सहकाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे संचालन ओम कुदळे तर आभार गणेश कन्नाके यांनी मानले.
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ही केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे,तर आपली नैतिक कर्तव्यदेखील आहे. शिक्षणाच्या प्रवासात या मुलांसाठी छोटासा हातभार लागतो,तेव्हा खरं समाधान मिळतं.”
— नितीन मिर्झापूरे (संस्थापक अध्यक्ष,राजुमुद्रा प्रतिष्ठान)
या उपक्रमाचे उपस्थितांनी आणि पालकांनी मनःपूर्वक कौतुक केले.
शिक्षणाच्या वाटचालीत मदतीचा दीप लावणारा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.