मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीला बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. यापूर्वी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान बंगालचा ब्रँड अॅम्बेसेडर होता.त्यामुळे सुपरस्टार किंग खान ऐवजी दिदीने दादा म्हणजेच सौरभ गांगुलीला आपली पसंती दिली आहे
सौरभ गांगुली हा यवकांमध्ये आजही ओकप्रिय असून त्याची चांगली क्रेझ आहे त्याच्या लोकप्रियतेचा फसिड व्हावं म्हणून त्याला भाजपाने गळाला लावण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण दादा काही गळाला लागला नव्हता त्यामुळेच त्याला वर्ल्डकप फायनल सामन्यात बोलवल्या गेले नाही अशी चर्चा आहे.
दीदी मला प्रत्येक चांगल्या प्रसंगी फोन करतात. त्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. कधीकधी मला समजत नाही की त्या मला का कॉल करतात? पण या सन्मानाने मी भारावून गेलोय, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे. त्यामुळे आता आगामी २०२४ च्या निवडणुकीत दादा व दीदी चा किती प्रभाव पडतो हे पाहणे गरजेचे आहे
गांगुलीला पश्चिम बंगाल राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलंय. तो यापूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचा अध्यक्ष होता राजर बिन्नी बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यापूर्वी सौरभ गांगुली हे अध्यक्ष होते एक महान फ्लनदाज व यशस्वी कर्णधार अशी दादा ची ख्याती आहे.
विरोधी पक्ष व केंद्रीत सत्तेत असलेल्या भाजप कडून नेहमी बंगाल वर हिसाचारचे राज्य असल्याची टीका करत आला आहे.
अनेक लोक म्हणतात की बंगाल ही केवळ हिंसाचाराची भूमी आहे. मग तुम्ही सर्वजण इथं कसे आला आहात? असा खोचक सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला.