शहरात अघोषित भारनियम, मनसेचे महावितरणला निवेदन
वणी/ प्रतिनिधी :
एकीकडे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत असताना, दुसरीकडे वीज कंपनीच्या मनमानी कारभाराचा वीज ग्राहकांना फटका बसत असून काेणत्याही वेळेला विना सुचना वणी शहरासह चिखलगाव, गणेशपुर, लालडगुडा, मेघदूत कॉलनी, छोरीया टाउनशिप परिसरात वांरवार भारनियमन हाेत आहे. वीज कधीही येते आणि कधीही खंडित होते. याप्रकाराने रहिवाशी संतप्त झाले असून वीज कंपनीविराेधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.
शहरासह परिसरातील संपूर्ण भागात वीज कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे. या भागात भार नियमन कधी असते? याची माहिती नागरिकांना मिळत नाही. तर वीज खंडित होते आणि कधीही येते याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. वीज पुरवठा पुर्ववत कधी हाेणार ? याबाबत संबंधित अधिकाऱ्यानां विचारल्यास त्यांच्याकडून याेग्य उत्तरे मिळत नाही. अनेक वेळा हे कर्मचारी व अधिकारी नागरिकांचे फोनच उचलत नसल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास निवेदन देऊन शहरातील वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मनसेचे वणी शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर घाटोळे,विलास चोखारे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, मयूर मेहता, संकेत पारखी, कृष्णा कुकडेजा, शुभम नैताम यांच्या सह अन्य उपस्थित होते..