केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नाव देशाला नाही तर जगाला माहिती आहे.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात पाच वेळा महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य म्हणून राहिलेले नितीन गडकरी १९९५ ते १९९९ या शिवसेना भाजप युती च्या सरकार मध्ये त्यांच्या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग होते आणि त्यावेळी स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील मुंबई-पुणे एक्स प्रेस वे हा पहिला महामार्ग त्यांनी विक्रमी वेळात पूर्ण केला तेव्हा स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना रोडकरी असे म्हंटले होते.मुंबई सोबत सेवा महानगरातील उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी त्यांचा मोठा सहभाग होता.
पुढे ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले अन नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले २०२४ ला नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी यांनी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक लढवली व विक्रमी मताने विजयी देखील झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरी यांच्यावर परिवहन व मार्ग निर्माण मंत्री म्हणून जवाबदारी दिली.त्यावेळी पक्षीय अभिनिवेश न पहाता ज्या ज्या खासदाराने रस्त्याची मागणी केली ती त्यांनी पूर्ण केली सर्वात जास्त लांबीचे महामार्ग बांधले
आजही सरकार कडे पैसे नाही असे ते कधीच म्हणत नाहीत फक्त महामार्ग व पूल सांगा असे ते म्हणतात.
गडकरी म्हणजे राजकारणात खरे व बिनधास्त बोलणारे नेते म्हणून ओळखल्या जातात. ते कधी बोलण्यातून काय परिणाम होईल याची चिंता करत नाहीत अगदी स्वपक्षाच्या नेत्यांचे देखील ते कान टोचतात
अमरावती येथे त्यांना कर्मवीर स्व.डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात जातीयवाद व धर्म व्यवस्था या विषयाचा धागा पकडत ते म्हणाले की जनता जातीयवादी नाही आम्ही नेते जातीयवादी आहोत धर्म व जात आम्ही त्यांच्या डोक्यात भरवतो
मी जेव्हा निवडणुकीत उभा होता तेव्हा म्हटले होते जात पाहून मतदान करू नका मत नाही दिले तरी चालेल पण मला सर्वांनी मतदान केले मी जात धर्म पाहून काम करत नाही असेही ते म्हणाले.
जेव्हा गडकरी यांना पंडित म्हटलेलं आवडले नाही तेव्हा…
यावेळी गडकरींनी त्यांना दुसऱ्या राज्यात आलेला अनुभवही संगितला. ते म्हणाले, “मी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जातो. जसे आपल्याकडे मराठा-कुणबी आहेत, तसे तिकडे ब्राह्मण जात आहे. मी गेलो होतो. ते म्हणाले पंडित नितीन गडकरी आले. मी म्हटलं प्रश्न पडला पंडित का म्हणत आहेत? मी त्याला बोलावलं आणि विचारलं की, माझं पंडित म्हणून का नाव घेत आहात?”
अन् गडकरी म्हणाले, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही
गडकरी पुढे सांगताना म्हणाले, “तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाहीये. पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या ब्राह्मणांच्या मनात जर दुसरं कुठलं नाव आहे, तर ते पंडित नितीन गडकरींचं नाव आहे, तुमचं नाव आहे. मी म्हणालो, जे काही असेल. पण, माझं नाव पंडित म्हणून घ्यायचं नाही. हे मी नाही करणार. खऱ्या अर्थाने खालचं वातावरण बदललं आहे. ते बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.” अशा या नेत्यांचे सर्वच पक्षात मधुर समंध आहेत.
प्रमोद कुदळे
संपादक बोल महाराष्ट्र