महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी केले.
आज १ मे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोस्टल ग्राउंड, यवतमाळ येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास ना.संजय भाऊ राठोड यांनी वंदन केले. तसेच पोलिस दलाकडून यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यावेळी विशेष कामगिरी बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार ना.संजय भाऊ राठोड यांच्या करण्यात आला. प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, अधिकारी-कर्मचारी आदींना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या ना.संजय भाऊ यांनी शुभेच्छा दिल्या.