23 नोव्हेंबर (नागपूर) : जर देशात केंद्रात काँग्रेसला सत्ता मिळाली तर जातीनिहाय जनगणना करू अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. एका लग्न समारंभासाठी नागपूर दौऱ्यावर असलेल्या खरगे यांनी गुरुवारी विमानतळावर बोलताना हे आश्वासन दिले.
याबाबत बोलतांना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जातीनिहाय जनगणना हा देशातला सर्वात मोठा मुद्दा आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास देशातला निधी कोणत्या आधारावर वितरित केला जातोय, तेदेखील या माध्यमातून सर्वांच्या समोर येईल अशी राहुल गांधी यांची भूमिका आहे. आमचीही हीच भूमिका आहे असे असे खरगे यांनी सांगितले. भाजपा नेते काँग्रेसवर तुष्टीकरणाचे आरोप करीत आहेत. पण, तुष्टीकरणाचे राजकारण भाजपाच करीत आहे. काँग्रेस पक्ष आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत म्हणून भारत जोडो यात्रा करीत असल्याचे खरगे यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्या नंतर ठरवू असे त्यांनी सांगितले