ब्रेकिंग;
नगर महामार्गावर भीषण अपघात
प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
अपघाताचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जण मृत्यूमुखी पडल्याची बातमी समोर येत आहे. बरं जाणाऱ्या कंटेनर ने दोन दुचाकी स्वारांना मागून जोरात धडक दिल्यामुळे मोठा भीषण अपघात झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार अहमदनगर संभाजी नगर महामार्गावर मनाला हे लावून टाकणारी घटना घडली आहे अतिशय वेगात जाणाऱ्या कंटेनर ने दुचाकी स्वारास पाठीमागून धडक दिली आहे यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे मृतामध्ये पती-पत्नी आणि दोन चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. कंटेनर चालकाने अभ्यास करून पळ काढण्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर मृत कुटुंबीय वडगाव सावताळू तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून ते रविवारी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि एकाच स्कुटी वरून परत येत होते अशी माहिती समोर आली आहे.
