. बबलू जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आर्णी: येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले निर्भीड दै. सकाळ चे पत्रकार बबलू जाधव यांचा वाढदिवस अंजली ड्रेसेस व आर्णी पत्रकार संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अंजली ड्रेसेस चे संचालक राजेश श्रीवास व संतोष श्रीवास यांनी शाल श्रीफळ देऊन बबलू जाधव यांचा सत्कार केला. यावेळी आर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबीद फानन, प्रमोद कुदळे, सौ. पूजा ढाले, रंजना ताई आडे, परवेज बेग, नौशाद सय्यद, आरिफ खान, मनोज माघाडे,रशीद मलनस, जाकीर हुसेन, जाकीर सोलंकी, सद्दाम शेख, राजू राठोड ईत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.