शिवसेना राष्ट्रवादी फुटी नंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांना राज्यात मिळालेल्या सहानुभूती ची चर्चा देश भर झाली त्यामुळे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा याना खूप घाम गाळावा लागला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर रेकॉर्ड ब्रेक सभा घ्याव्या लागल्या ही सत्ताधारी भाजप साठी डोकेदुखी ठरली.दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो हे सांगणाऱ्या फडवणीस यांची दमछाक झाली.
सर्वे नुसार चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडी ने मारलेली मुसंडी पहाता सत्तेचे देऊळ भाजप ला पाण्यात दिसत आहे. चारशे पार चा बार फुसका ठरतो की काय अशी शंका व्यक्त करतांना भाजप दिसत आहे.
पाचव्या टप्प्यात ८ राज्यात लोकसभेच्या ४९जागांसाठी मतदान होईल. बिहारमध्ये ५, झारखंडच्या ३, महाराष्ट्रातील १३, ओदिशामध्ये ५, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालच्या ७ आणि जम्मू-कश्मीर आणि लडाखच्या १ जागेवर मतदान होईल. सर्व टप्प्यातील निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
या निवडणुकीत शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.