उपरे येथे येऊन बंदद्वार उद्धव ठाकरे व शरद पवार यांना संपवण्यासाठी खलबत करता मला औरंगजेब फॅन क्लब चा अध्यक्ष म्हणता तुम्ही अब्दाली शहा आहात असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्री अमित शहा यांचा समाचार घेतला.
अमित शाह यांनी चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन बंददाराआड मला आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावे. हिंमत असेल तर अमित शाह यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलतान त्यांनी भाजपावर तसेच शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“अमित शाह हे आठ दहा दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन गेले. त्याच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात येऊन गेले. त्यावेळी त्यांनी मला औरंगजेब फॅन्स क्लबचा सदस्य म्हटलं. पण मला जर ते औरंगजेब फॅन्स क्लबचा सदस्य म्हणतील तर ते अहमदशाह अब्दाली आहेत. चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन त्यांनी बंददाराआड मला आणि शरद पवार यांना संपवण्याची भाषा केली. त्यांनी आता बंद दाराआडचे धंदे बंद करावे. त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी, हे बाजारबुणगे बाहेरून येतात आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याची भाषा करतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.