काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादया कडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असताना पाकिस्तान ने ही जबाबदारी झटकली होती ही पाकिस्तान ची नेहमीचंच सवय आहे.
दहशतवादी पोसणारा देश म्हणून जगभरात पाकिस्तान ची ओळख आहे.२६/११ च्या मुंबई हल्ल्यात सरळ सहभाग असून पाकिस्तान ने तो नाकारला होता.आताही हल्ला करणारे सर्व दहशतवादी पाकिस्तान चे असल्याचे निष्पन्न झाले. देशातून पाकिस्थान ला धडा शिकवण्यासाठी युद्ध करा अशा भावना आहेत मात्र युद्ध हे परवडणारे नसते.म्हणून आक्रमक भारताने पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत.
दहशतवादी हल्ला
जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला.
वृत्तानुसार, हल्लेखोरांनी बैसरन खोऱ्याच्या वरच्या कुरणांवर गोळीबार केला, जिथे फक्त पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचता येते. दहशतवादी लपून बसले होते, ज्यावरून नियोजित हल्ला असल्याचे सूचित होते.
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) उचलत असलेल्या पुढील पाच पावलांची घोषणा केली आहे.
१)सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे.
२)पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही.
३)पाकिस्तानला लागून असलेली अटारी सीमा बंद केली जाईल.
४)भारत पाकिस्तानमधील आपल्या उच्चायुक्तालयातून कर्मचारी परत बोलावणार आहे.
५)पाकिस्तानी नागरिकांचे सध्याचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागेल.