कश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथे पर्यटकांचा झालेला नरसंहार त्यामुळे देशात चीड निर्माण झाली असून धर्म विचारून गोळ्या झाडून ठार केल्याचा जोरदार प्रचार झाल्याने व मीडियातून सतत हिंदू मुस्लिम द्वेषाची बीजे रोवली जात आहे.त्याचे पडसाद आता देशभर पहायला मिळत आहेत.
कविष अझीझ kavish aziz नामक एका महिलेने एक पोस्ट करून भोपाळ रेल्वे स्टेशन जवळचा घडलेला प्रकार एक्स अकाऊंट वरून पोस्ट केला व व्हायरल व्हिडीओ देखील टाकला
घटनेत चार पाच तरुण मद्यधुंद अवस्थेत एका पोलीस गाडीतील बसून असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण करून गाडीतून खाली ओढतात व मारहाण करत कपडेही फाडत आहेत.
दुसरा एक पोलीस सोडवायला मधात पडला त्याला तुम हिंदू भाई हो तुम्ही बाजूला जा असे म्हणताना व्हिडिओत दिसत आहे.ज्या पोलिसाला मारहाण झाली त्याने मद्यपी युवकांना हटकले व येथून निघून ज असे म्हटले त्याच्या वर्दी वर त्या तरुणांनी नाव पाहिले त्याचे नाव दौलत खान असे दिसताच तुम्ही हिंदूंना शिवीगाळ करता म्हणून मारहाण केली.ही घटना भोपाळ च्या हबिबगंज रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याचे कळते.व्हिडीओ पाहून पोलीस त्या तरुणांचा शोध घेत आहेत.
पोलीस शोध घेतील कारवाई करतील पण देशातील धार्मिक द्वेषाचे वातावरण निर्माण होणे हे भारताच्या एकतेला व अखंडतेला बांधव आहे
बोल महाराष्ट्र व्हिडीओ ची पुष्टी करत नाही