आर्णी नगरपरिषद व्हावी म्हणून लढा उभारणारे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक चळवळीतील संवेदनशील नेतृत्ब राजेंद्र शिवरामवार यांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आर्णी वणी चंद्रपूर च्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे लक्ष वेधले.
त्यांनी दिलेल्या निवेदनातून आर्णी नगरपरिषद हद्द म्हणजे औद्योगिक क्षेत्र त्यामळे मनरेगा सारख्या योजनांचा लाभ आर्णी मनपूर दत्तरामपूर कोळवन येथील शेतकऱ्यांना होत नाही त्यामुळे शेतकरी वयक्तिक सिंचन विहीर,शेततळे, गाय गुरांचा गोठा,पशु संवर्धन विभागाच्या योजना कृषी विभागाच्या योजना जसे फळझाड लागवड यासारख्या योजना पासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी विनंती निवेदनातून राजेंद्र शिवरामवार सर यांनी केली आहे.
वास्तविक पहाता क दर्जाच्या नगरपरिषद ला मनरेगा योजना देण्यात येतात तसा शासन निर्णय देखील आहे पण शासन स्तरावर लोकप्रतिनिधी नी याचा पाठपुरावा केला तर शिवारामवार सर च्या मागणीला यश नक्की मिळेल यात शंका नाही.