शिक्षण घेत असतांना मुला मुलींचे डॉक्टर इंजिनिअर सनदी अधिकारी होण्याचे व त्यातून देश सेवा करण्याचे स्वप्न असते आई वडील देखील आपल्या पाल्यास प्रोत्साहन देखील देतात.
मात्र आर्णी च्या चिमुकल्या प्रियल अशोक अग्रवाल हिने शास्त्रज्ञ होण्याच्या दिशेने मार्ग निवडला असून. लाखो विद्यार्थ्यांतून इनस्पायरिंग यंगेस्ट सायंटिस्ट अवार्ड २०२५ साठी तिची निवड झाली आहे.
डॉ.होमी भाबा फाउंडेशन तर्फे दिल्या जाणारा पुरस्कार कु.प्रियल हिने मिळवून आर्णी शहराचे आपल्या गुरुजनांचे आई वडिलांचे नाव लौकिक केले तिच्या ह्या अतुलनीय कामगिरी बद्दल कु प्रियल चा ठिकठिकाणी सत्कार झाला आहे.आज वणी आर्णी चंद्रपूर च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रभावित होऊन आज आर्णी पंचायत समिती च्या सभागृहात सत्कार केला.
प्रियल अग्रवाल, तनिष्का अग्रवाल,वडील अशोक अग्रवाल,आई पूनम अग्रवाल देखील उपस्थित होते .याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार काँग्रेस चे युवा नेते जितेंद्र मोघे आर्णी चे माजी नगराध्यक्ष अरीज बेग माजी नगराध्यक्ष अनिल आडे,सुनील भारती, बाळासाहेब शिंदे,छोटू देशमुख तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार सुनील नाईक गटविकास अधिकारी रमेश खारोडे,उपविभागीय अधिकारी पावरा व इतर मान्यवर उपस्थित होते.