आर्णी शहरात दररोज ग्रामीण भागातून शेकडो नागरिक विविध कामाच्या निमित्ताने येत असतात.आर्णी बसस्थानक परिसरात पाण्याची व्यवस्था नाही.अशात मुख्य रस्त्यावर कुठल्याही हॉटेल मध्ये पाणी पिऊ देतील की नाही हा प्रश्न उपस्थित होतो.बिसलरी पाण्याची एक लहान बॉटल घेतली तर किमान १० रुपये खर्च होतो.
अशात उन्हात तहानलेल्या नागरिकांना तृष्णा तृप्ती साठी मुनगीनवार परिवाराने बसस्थानक समोरील नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोर मनोज मुनगीनवार संचालक असलेल्या मनोज ऑटोमोबाईल समोर थंड पाण्याच्या बॅरेल ची व्यवस्था केली आहे. त्यामुळे येथे दररोज शेकडो माता भगिनी स्त्री पुरुष अबाल वृद्ध पाणी पिऊन आपली तृष्णा तृप्ती करतात.
अगदी रस्त्याच्या कडेला असल्याने दिसता क्षणी तहानलेला जीव पाण्याकडे वळतो.मुनगीनवार परिवारात सामाजिक सेवेचे बाळ कडू कुटुंबातून मिळाले वामनराव मुनगीनवार हे दरवर्षी काही गरजू महिलांना साडी चोळी नित्याने दिवाळीस करतात.त्यांचे जेष्ठ पुत्र शिवसेना उबाठा चे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार म्हणजे समाजसेवेचा अखंड झरा त्यानाही गोर गरिबांचे विवाह लावून दिले.कोव्हिडं च्या काळात अन्नछत्र राबवून हजारो गरजूंना अन्न दान सेवा दिली त्यानंतर रेशन व जीवनावश्यक वस्तू ची किट देखील वाटप केली.या कामात त्यांचे बंधू माजी नगरसेवक प्रवीण मुनगीनवार त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी प्रवीण मुनगीणवार ,लहान भाऊ मनोज मुनगीनवार त्यांच्या पत्नी सौ.मृन्मयी मनोज मुनगीनवार,बाळासाहेब मुनगीणवार यांना सामाजिक कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.पूजा ताई बाळासाहेब मुनगीनवार याचीही कोरोना काळात समाजसेवेस साथ लाभली.गरजू लोकांना हिवाळ्यात मायेची ऊब मिळावी म्हणून हजारो ब्लॅंकेट चे वाटप देखील त्यांनी केले.
जगणे थोडे समाजासाठी या उक्ती प्रमाणे शहर असो वा तालुका कुठल्याही दुःखात संकटात संवेदनशील मुनगिनवार परिवार मदतीला धावतो हा इतिहास आहे.आज लोकांची तहान भागविणार्या मुनगीनवार परिवाराच्या कार्याची सर्वत्र चाच होत आहे त्यांच्या या सेवाभावी कार्यास बोल महाराष्ट्र पोर्टल चा मानाचा मुजरा….!